पनवेल येथे मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश कार्यालयाचे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न व दिनदर्शिका वाटप




पनवेल दि . २० ( संजय कदम ) : पनवेल येथे मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश कार्यालयाचे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न व  दिनदर्शिका वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . 


                     मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम यांच्या सूचनेनुसार व प्रमुख उपस्थितीत कोकण प्रदेश मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फित कापून करण्यात आला 


कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त व कोकण प्रदेशाध्यक्ष विनोदराव चव्हाण यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सचिव संजयराव साळवी राज्य महिला अध्यक्षा प्रा सौ संध्या सचिन राणे गुजरात राज्य मराठा समाज नेते उद्योजक राजुभाई शेवाळे कोकण प्रदेश महीला अध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले नवी मुंबई अध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र महापदी रायगड जिल्हा अध्यक्ष पी डी देशमुख जिल्हा सरचिटणीस प्रथमेश सावंत मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मुरलीधर पाटील निवृत डी वाय एस पी सौ विभा विनोदराव चव्हाण सातारा जिल्हा नेते ॲड किरण सनस पनवेलचे माजी नगराध्यक्ष उद्योजक जे एम् म्हात्रे शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुढेकर,अनिल जाधव , यशवंत भगत ,संजय कदम , यतीन देशमुख ,राजेंद्र भगत ,प्रवीण जाधव ,परब यांच्या सह  सर्व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांसह शेकडो समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


 या वेळी मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय दिनदर्शिका वाटप करण्यात आले देशभर पसरलेल्या हजारो समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे पर्यंत पोहचवण्याचे काम कार्यकर्ते करणार असुन उद्घाटन प्रसंगी हजारो २०२३ च्या दिनदर्शिका वाटप करण्यात आले. 



थोडे नवीन जरा जुने