पनवेल अर्बन बँक निवडणूकीत स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाची भूमिका महत्वाची जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे





पनवेल दि . २० ( वार्ताहर ) : पनवेल अर्बन बँक निवडणूकीत स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाची भूमिका महत्वाची असेल असे मत जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी व्यक्त केले आहे . 



                     स्वाभिमानी पक्षाला मानणारे सुमारे पाचशे मतदार या  निवडणुकीत   मतदान करणार आहेत. या निवडणुकीत  महाविकास आघाडी व भाजप व समर्थक पक्ष समोरासमोर उभे आहेत.  स्वाभिमानी पक्षाचा कोणताही उमेदवार उभा  नसला तरी स्वाभिमानीला मानणारे मतदार हे निर्णायक भूमिका बजावणार आहेत. 


कोणत्या गटाला मतदान करायचे किंवा पाठींबा जाहीर करायचा याचा निर्णय लवकरच महेश साळुंखे जाहीर करणार आहेत.स्वाभिमानी रिपब्लिकन  युथ पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आगामी पनवेल अर्बन बँक निवडणूकी विषयी आपली रणनिती विषयी सांगीतले की येत्या २७ नोव्हेंबरला  पनवेल अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान येत्या रविवारी २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. 

तत्पूर्वी आमच्या समर्थक मतदारांची बैठक घेऊन ठोस भूमिका घेण्यात येईल .असे साळुंके यांनी सांगितले आहे . 

थोडे नवीन जरा जुने