पनवेल दि . २० ( वार्ताहर ) : येत्या ६ डिसेंबर रोजी दादर येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिना निमित्त पनवेल मध्ये जय्यत तयारी स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे .
या संदर्भात स्वाभिमानी युथ अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पनवेल येथे घेतली . पनवेल व रायगड जिल्ह्यातून हजारो भीम सैनिक दादर येथे अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत . त्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले .
त्याच प्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर व ६ डिसेंबर या दिवशी दादर येथे येणाऱ्या सर्व भिम सैनीकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे. व त्याची तयारी पनवेल तालुक्यातील देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली आहे .
Tags
पनवेल