पनवेल, (संजय कदम)
गोवा म्हापसा गुरुवार दिनांक 19. 01. 2023 रोजी आई इन्फ्रा कंपनीच्या गोवा म्हापसा येथील साई श्रीजी अपार्टमेंट या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. वादळवाराचे संपादक माननीय श्री. विजय कडू साहेब यांच्या शुभ हस्ते साई श्रीजी अपार्टमेंट या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आई इन्फ्रा कंपनीचे मालक नरसू पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले.
याप्रसंगी माननीय विजय कडू साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आई इन्फ्रा कंपनीचे सुप्रसिद्ध मराठी बिल्डर नरसू पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि त्यांचे पार्टनर मिलिंद ठाकूर, शिरीष म्हात्रे, नितीन गुप्ता व गोवा राज्यांची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे त्यांचे चिरंजीव ब्रम्हानंद पाटील यांच्या सहकार्याने द्रोणागिरी नवी मुंबई येथे पंधरा इमारतींचे बांधकाम पूर्ण केले असून तेथे अजून दहा इमारतींचे बांधकाम सुरू आहे. येत्या चार ते पाच वर्षाच्या कालावधीत द्रोणागिरी मध्ये शंभर इमारती बांधण्याचा त्यांचा मानस आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तसेच कर्नाटक निपाणी येथे 184 दुकानांनी समजलेल्या आकर्षक साई मॉल आई इन्फ्रा कंपनी निर्माण करत आहेत.
त्याच बरोबर गोवा थिवीम येथे साई समृद्धी प्रकल्पाचे बांधकाम दर्जेदारपणे पूर्ण केले असून पाच बंगलो आणि दोन अपार्टमेंटचे पझेशन सुद्धा देण्यात आले आहे. तसेच कोलवाल गोवा येथील साई स्वामी नारायण या दुसऱ्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. आज माझ्या हस्ते आई इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या साई श्रीजी अपार्टमेंट या नूतन इमारतीचे भूमिपूजन करून गोवा राज्यात तिसरा प्रकल्प हाती घेतला आहे.
नरसु पाटील हे माझे छोटे भाऊ आहेत. एक मराठी माणूस, मराठी बिल्डर प्रचंड मेहनतीने महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात प्रचंड गरुड भरारी घेऊन बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील हजारो लोकांना माफक दरात घरे देऊन आई इन्फ्रा कंपनीने ग्राहकांच्या व जनतेच्या मनात प्रचंड विश्वास निर्माण केला आहे. मी दैनिक वादळवाराचा संपादक म्हणून नरसू पाटील, त्यांचे चिरंजीव ब्रह्मानंद पाटील आणि आई इन्फ्रा टीमचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो. असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड म्हाळेवाडी गावचे सरपंच सी. ए. पाटील सर, उद्योजक शरद पाटील, रवी माने, दयानंद सलाम, पत्रकार संतोष वावळ, फॉरेस्ट ऑफिसर काटकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते एन. आर. पाटील सर, मिलिंद ठाकूर, रमाकांत गावंड, विशाल सावंत, रघुनाथ पाटील, मनोज गोसावी, पद्मिनी पाटील, प्रियवंदा तांबोटकर, डॉक्टर प्रणाली पाटील, सोनाली पाटील, चैताली ठक्कर, संतु दादा, सुरेश शेठ, रवींद्र चव्हाण, प्रथमेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल