पनवेल दि.२२( वार्ताहर): रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाश्याचा मोबाईल तर दुसऱ्या प्रवाशाची रोख रकमेची बॅग चोरीस गेल्याची घटना घडल्याने प्रवासी वर्गामध्ये भीतीयुक्त वातावरण आहे
पनवेल येथे राहणारे रामनिवास चौधरी हे सीएसएमटी ते पनवेल असा लोकल प्रवास करीत असताना अज्ञान चोरट्याने त्याच्या खिशातील २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन लंपास केला ही बाब त्यांच्या खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर आल्यावर लक्षात आल्याने त्यांनी याबाबतची तक्रार पनवेल रेल्वे पोलिसांकडे दाखल केली आहे. तर दुसऱ्या घटनेत अक्षय बनकर हे सीएसएमटी ते पनवेल असा लोकल प्रवास करीत असताना त्यांची बॅग चोरण्यात आली असून त्या बॅगेमध्ये १५ हजार रुपयांची रोख रक्कम असल्याने याबाबतची तक्रार त्यांनी वाशी रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे
Tags
पनवेल