गाडगीळ गुरुजी सामाजिक व शैक्षणिक संस्था गुळसुंदे याच्या वतीने अदीवासीवाडी गुळसुंदे येथे मेडिकल चेक अप कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम पी.एच.सी.आपटा,शंकरा आय इन्स्टिटय़ूट व व्हीस्टा प्रोसेस फुड प्रा.ली यांच्या सहकार्यातून आयोजीत करण्यात आला होता.या कॅम्प मध्ये साधारण 100 अदीवासी बांधवांची आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासण्या करण्यात आल्या व आजारांच्या अनुषंगाने औषधे वाटप करण्यात आले.
सदर तपासणीअंती काही गंभीर अजार उद्भवल्यास व खर्चिक उपचार करावा लागल्यास आशा रुग्णाना अर्थीक साह्य गाडगीळ गुरुजी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.
शंकरा आय इन्स्टिटय़ू च्या माध्यमातून डोळ्यांच्या संदर्भातील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.तसेच चष्म्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास मा.नायबतहसिलदार श्री.नाईक साहेब,शीवसेना नेते व सामाजिक कार्यकर्ते व व Vista foods चे सल्लागार श्री.चंद्रशेखर सोमण,तसेच पनवेल मधील जेष्ठ उद्योजक श्री.इक्बाल काझी साहेब,शंकरा आय इन्स्टिटय़ूट च्या रोहीणी खाडे,रसायनी पोलीस स्टेशन उपनिरीक्षक श्री.बालवडकर साहेब,चार्टंन्ड आकाउन्टट,श्री.सिंगासने साहेब,व्हीस्टा फुड कंपनीचे अधीकारी सौ.इंद्रायणी आगलावे,श्री. प्रवीण ठाकुर,श्री.कमलेश शिर्के,प्रथमेश पाटील,पत्रकार श्री.अनिल भोळे,श्री.बी.एस.कुलकर्णी,अरोग्य अधीकारी डॉ.उरणकर,डॉ.,थोरात व परिचारीका तसेच सरपंच हरीश बांडे,श्री.आर.डी.पाटील,ग्रामस्थ जीतेंद्र गाताडे,अजिंक्य सुर्वे,शेखर पाटील,संतोष चौलकर,जयवंत महाडीक,समाधान पाटील,नीखिल पाटील,सुभाष केदारी,दतात्रय शीगवण,काशीनाथ गाताडे व संस्थेचे पदाधीकारी व सदस्य उपस्थित होते.
Tags
पनवेल