अल्पवयीन विद्यार्थ्याने केला सहकारी विद्यार्थिनीवर बलात्कार



पनवेल दि.१० (वार्ताहर) : महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर तिच्याच वर्गातील शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित पीडित बालिका ही पाच आठवड्यांची गरोदर आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर संशयित बालकाविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस या घटनेचा तपास गांर्भियाने करत आहेत.


संशयीत बालक हा रोडपाली येथील सेक्टर २० मध्ये राहत होता. तर पिडीता ही तिच्या पालकांसोबत सेक्टर पाच येथे राहते. पीडितेचे वय १७ वर्षे पाच महिने आहे. तर संशयीत आरोपी बालक हा १७ वर्षांचा आहे. डिसेंबर महिन्यात पीडिता मित्राच्या घरी गेल्यावर त्याने अत्याचार केल्याचे उघडकीस आले. सध्या ती पाच आठवड्यांची गरोदर असल्याचे पालकांच्या ध्यानात आल्यावर हे प्रकरण शाळेत आणि पोलीस ठाण्यात पोहचले. कळंबोली पोलिसांनी सदर अल्पवयीन विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदविला असून पोलीस या घटनेचा तपास गांर्भियाने करत आहेत.


थोडे नवीन जरा जुने