पनवेल दि.१० (वार्ताहर) : रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट बघत असताना रेल्वे बाकड्यावर विसरलेला मोबाईल प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी परत मिळवून दिला आहे. रेल्वे पोलिसांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
वडाळा येथील रहिवासी उषा अलदर कामानिमित्त पनवेल येथे आल्या होत्या. रेल्वेची वाट पाहत असताना उषा ह्या खांदेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये बाकड्यावर त्यांचा १९ हजार रुपये किमतीचा मोबाइल विसरल्या. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना हा मोबाइल सापडला व त्यांनी तो उषा यांना परत केला. हरवलेला मोबाइल परत मिळवून दिल्याने उषा यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे.
Tags
पनवेल