रविवारी खारघर मॅरेथॉन व्यसनमुक्तीसाठी खारघर धावणार



१७ हजारहून अधिक स्पर्धकांची नोंदणी; सेलेब्रेटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती


पनवेल (प्रतिनिधी) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स णि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी 'एक धाव व्यसनमुक्तीसाठीहे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन 'खारघर मॅरेथॉ २०२३' होणार आहे. 



  खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी ०९ वाजता होणार आहेमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैय्यापनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रमुख मान्यवर म्हणून उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदीसुप्रसिद्ध बॉलिवूड हास्य अभिनेता राजपाल यादवसिने अभिनेता  दिग्दर्शक दिनाथ कोठारीसिने अभिनेत्री  मांजरेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.  सामाजिक  शारीरिक हि जोपासले जात उत्कृष्ट  सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेतयंदाची हि स्पर्धा १३ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतरमहिला खुला गट १० किलोमीटर अंतर वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर१७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर१४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर१४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतरतसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, पत्रकार गट ०२ किलोमीटर अशा १३ गटात हि स्पर्धा होणार असून विजेत्यांना  ला ९६ हजार रुपयांची बक्षिसे आहेततसे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानि करण्यात येणार आहे




  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरआमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारं झाला. त्यानंतर हि स्पर्धा खारघर शहरात आयोजित करण्यात आली. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यं उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली आणि त्या अनुषंगाने या वर्षीच्या स्पर्धेत १७ हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग नोंदला गेला आहे.  




थोडे नवीन जरा जुने