पनवेल दि. २१ (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रभाग क्र १८ शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक वर्ष २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यंदाचे या स्पर्धेचे ११ वे वर्ष असून या स्पर्धेचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला यांच्या हस्ते केला. यावेळी आयोजक व शहर प्रमुख पनवेल अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जाधव, पत्रकार संजय कदम, पत्रकार केवल महाडिक, मा नगरसेवक विश्वास म्हात्रे, मा नगरसेवक अनिलकुमार कुळकर्णी, महिला आघाडी शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, विभागप्रमुख अमित माळी, शाखाप्रमुख शुभम माळी, उपशाखाप्रमुख राकेश भगत, उपशाखाप्रमुख राज मांडवकर, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण ठाकूर, चैतन्य शेट्ये, जोशी, यतीन मानकामे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यास्पर्धेत पनवेल शहरातील एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत.
Tags
पनवेल