परिवर्तन सामाजिक संस्थेचा दुहेरी कराचा लढा बळकट



पनवेल दि.२१(वार्ताहर):  परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दुहेरी कराचा लढा अधिक बळकट होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
        सिडको वसाहतीतील नागरिकांवर लादण्यात आलेला दुहेरी करा विरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 


19 जानेवारी रोजी याबाबत माननीय उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्त्याचे वकील ऍड विजय कुर्ले न्यायालयीन कामकाजासाठी गुजरात येथे गेले असल्याने त्यांच्या ऐवजी ऍड पार्थो सरकार न्यायालयात उपस्थित होते. मा. उच्च न्यायालयाने 5 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार परिवर्तन सामाजिक संस्थेच्या संस्थापक सदस्य यांची तुलनात्मक बिले सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे वामन एस मोरे व सुनीता अशोक भंडारे यांची सिडको आणि पनवेल महानगरपालिकेची तुलनात्मक बिले सादर करण्यासाठी आपण तयार होतो. 


मात्र न्यायालयाने ई फाइलिंग धोरणानुसार ही कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 9 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेचे कौन्सिल आशुतोष कुंभकोणी यांनी महादेव वाघमारे हे करदाते नाहीत असा दावा केला होता. त्यांना पनवेल करांच्या वतीने न्यायालयात याचिका करता येणार नाही अशी हरकत घेतली होती. त्यावर मा.सुप्रीम कोर्टाच्या एका प्रकरणाचा दाखला देऊन 226 कलमा अंतर्गत कोणत्याही जनहितासाठी कुठे कायद्याचे किंवा नियमांचे उल्लंघन होत असेल तर आपल्या देशातील 160 कोटी जनतेमधून कोणीही न्यायालयात येऊ शकतो. हे जजमेंट सुद्धा न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत मालमत्ता करावर सुनावणी होणार आहे. पनवेलकरांना नक्कीच न्याय मिळेल याबाबत कोणाच्याही मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. असे याचिकाकर्ते महादेव वाघमारे यांनी सांगिलते आहे

थोडे नवीन जरा जुने