पनवेल दि २१(संजय कदम): पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून आपला पती कोठेतरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथ केली आहे.
प्रशांत रामचंद्र तांडेल (वय ३५ रा. आदर्श नगर, पळस्पे) उंची -५ फूट, अंगाने -जाड, रंग- गोरा, चेहरा गोल, नाक- मोठे, डोळे काळे व बारीक, केस काळे वाढलेले, तसेच त्याच्या उजव्या हाताच्या मागे ओम साई राम असे इंग्रजी मध्ये त्याच प्रमाणे १.७.१३ असे तसेच डाव्या हातावर प्रशांत हे नाव इंग्रजी मध्ये व उजव्या हातावर हनुमानाचा फोटो गोंदवलेला आहे. त्याच प्रमाणे त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट पायात सफेद रंगाचे शूज घातलेले आहे. या इसम बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४६७१२२ किंवा म.पो हवा एस. एस. बोराटे यांच्याशी संपर्क साधावा
Tags
पनवेल