लोकल मधून पडून महिलेचा मृत्यू



पनवेल दि.२१(संजय कदम): खांदेश्वर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वर एक ५५ वर्षीय महिला प्रवासादरम्यान लोकल मधून खाली पडली. तिला उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


            सदर महिला ही खांदेश्वर रेल्वे स्टेशनवरून लोकल ने जात असता ती लोकल मधून खाली पडून जखमी झाली. त्यावेळी तिला उपचार करीत पनवेल उपजिल्हा रुग्णलयात दाखल कऱण्यात आले. मात्र उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेचे वय -अंदाजे ५५ वर्षे, उंची ५.१ फूट, अंगाने - मध्यम, चेहरा- गोल, नाक- सरळ, डोक्याचे केस वाढलेले काळे पांढरे. तिच्या अंगात नेसणीस पिवळया व निळया रंगाची फिक्कट रंगाची साडी त्यावर गुलाबी हिरव्या निळया रंगाची फुले आहे. या महिले बाबत कोणास अधिक माहिती असल्यास  त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४६७१२२ किंवा पोलीस उप निरीक्षक भालचंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा


लोकल मधून पडून महिलेचा मृत्यूलोकल मधून पडून महिलेचा मृत्यू

थोडे नवीन जरा जुने