गुरुवारी पनवेलमध्ये यंग इंडिया रन २०२३ चे आयोजन




पनवेल(प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिन निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्यावतीने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक १२ जानेवारीला पनवेलमध्ये 'यंग इंडिया रन २०२३' चे आयोजन करण्यात आले आहे.


 
शहरातील वडाळे तलाव जवळ सकाळी ०६ वाजता या ५ किमी अंतराच्या दौडला सुरुवात होणार असून दौड पूर्ण करणाऱ्या पहिल्या ५०० जणांना आकर्षक टी- शर्ट आणि आकर्षण मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी रोहित जगताप ८६९१९३०७०९, अक्षय सिंह ९८२०८३८८५१, देवांशू प्रभाळे ८४३३५१३५४० किंवा अजिंक्य भिडे ८८५०६४४२०७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युवा मोर्चाच्या विने करण्यात आले आहे. 



थोडे नवीन जरा जुने