पनवेल दि २२(संजय कदम): खारघर परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा नातेवाईकांचा शोध खारघर पोलीस करीत आहेत
सदर इसमाचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे, रंग गहूवर्णीय, उंची ५ फूट ४ इंच, चेहरा गोल, केस वाढलेले असून अंगात फिक्कट रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसेच पायात काळ्या रंगाची सॅन्डल घातली आहे या इसम बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खारघर पोलीस ठाणे किंवा सपोनि निशांत धनवडे यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल