रत्नागिरी शहरातील रहाटाघर बसस्थानकातील स्वच्छतागृहाचे घाण पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र याकडे एसटी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी बसस्थानकाचे काम रखडल्याने ग्रामीण बससेवा रहाटाघर येथून सुरू आहे. मात्र रहाटाघर बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची परवड सुरूच आहे. रहाटाघर बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाचे पाईप फुटून पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरातील प्रवाशासह नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. मात्र अनेक दिवस एसटी प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रहाटाघर स्थानक परिसर व स्वच्छतागृहाचा पुरता बोजवारा उडाला आहे. परिसरात खड्डे पडले आहेत. यामुळे रहाटाघर स्थानकात जाण्यापेक्षा प्रवासी जुन्या बसस्थानकासमोरील रस्त्यावर बससाठी उभे राहणे पसंत करत असल्याचे चित्र आहे.
Tags
रत्नागिरी