रानसई येथे सात दिवसीय ग्राम विकास व संस्कार शिबीर आयोजित



 दि. 1.1.23, रानसई, पनवेल
सिद्धार्थ महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यामार्फत रानसई येथे सात दिवसीय ग्राम विकास व संस्कार शिबीर आयोजित केले होते. सदर कार्यक्रमातर्गत विविध उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये महिलांसाठी "मासिक पाळी शाप की वरदान?" या विषयान्वये वैचारिक सुसंवाद पार पडला.


 त्यामध्ये महाविद्यालयातील एनएसएस च्या विध्यर्थिनी आणि ग्रामीण महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमामध्ये मासिक पाळी विषयी असलेले समाजातील गैरसमज आणि अंधश्रद्धा याविषयी नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन तर्फे दीपक खाडे यांनी मार्गदर्शन केले.
 सदर कार्यक्रमामध्ये आजूबाजूच्या आदिवासी पड्यावरील मुलं आणि महिलांसाठी गृहउपयोगी वस्तू तसेच स्मार्ट चॉईस सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात आले.


 राजेंद्र मुंबईकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सरपंच राधा पारधी, विशाल करंजकर, राजश्री मुंबईकर, शैला खाडे, संजीव पार्थे, सिद्धार्थ वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि रानसई गाव तसेच आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिला आणि मुली उपस्थित होत्या.
थोडे नवीन जरा जुने