नवी मुंबईत पोलीस स्थापना दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; युवकांशी संवाद साधण्यावर भर



नवी मुंबईत सर्वत्र पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात जनसंवाद त्यात विशेषतः युवकांशी संवाद साधला जात आहे.



२ जानेवारी १९६१ पासून पोलीस स्थापना दिवस साजरा केला जातो. पहिल्या कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नवी मुंबईतही या निमित्ताने २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. याच “पोलीस रेजिंग” डे सप्ताह निमित्ताने आज (गुरुवारी) मानवसेवा माध्यमिक विद्यालय आणि जुनियर कॉलेज, महापे येथील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिवसाची थोडक्यात माहिती देऊन, सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड, अति मोबाईल वापराचा दुष्परिणाम, पोलीस हेल्पलाइन डायल ११२ कार्यप्रणाली बाबत माहिती देण्यात आली.


 तसेच दुर्दैवाने असे प्रसंग आलेच तर नेमके काय करायचे या विषयी मार्गदर्शन केले. या नंतर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत शंका निर्सन करण्यात आले. नमूद विषयांवरती योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थित विद्यार्थ्यांच्या या वेळी, संस्थाचालक नारायण डाऊरकर, कॉलेजचे प्राचार्य प्रकाश भोईर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर वृंद आणि शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने