पनवेल दि.०२ (वार्ताहर) : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येत असतात. शौर्य स्तंभाला अभिवादन करणासाठी निघालेल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल येथे गेस्ट हाउसजवळ स्वागत केले.
त्याचप्रमाणे भिमा कोरेगाव येथे झालेल्या स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेला उपस्थीत राहत शेकडो कार्यकर्त्यांना महेश साळुंखे यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा परीषदेच्या वडघर शाळेच्या मुख्याध्यापीका माधुरी मधुकर चौधरी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शाळा कमीटी अध्यक्ष चंद्रकील कोबडे, उपाध्यक्षा सोनाली महेश साळुंखे तसेच सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग, शाळा कमीटी सदस्य उपस्थित होते.
Tags
पनवेल