पनवेल दि. ०८ ( संजय कदम ) : रेल्वे प्रवासा दरम्यान मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये ई मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे .
केरळ येथील रहिवासी निखिल बालक्रिष्ण हे मत्स्यगंधा एक्स्प्रेसने ठाण्यात येत असताना पहाटे पावणेसहा वाजता चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये ई मेलद्वारे तक्रार केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
Tags
पनवेल