4 मार्च रोजी शिवगर्जना अभियान व शिवसैनिकांचा मेळावाचे उरण मध्ये आयोजन.




उरण दि 28 ( विठ्ठल ममताबादे) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्याच्या अनुषंगाने व पक्षाचे संघटन करून पक्ष संघटना आणखीन मजबूत करण्याच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचा उरण विधानसभा मतदार संघातर्फे शनिवार दि. 04 मार्च 2023 रोजी सांयकाळी 6 वाजता जे. एन. पी.टी. मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप, उरण येथे शिवगर्जना अभियान व शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.



सदर मेळाव्याला माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उपनेते नितीन बानुगडे, उपनेत्या श्रीमती मीना कांबळी, उपनेत्या विशाखा राउत, माजी आमदार तुकाराम काते, माजी आमदार राजाभाऊ वाजे, महिला आघाडी नेत्या श्रीमती तृष्णा विश्वासराव, युवासेना कार्यकारीणी सदस्य - राजोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या शिवगर्जना अभियान व शिवसैनिकांच्या मेळाव्या प्रसंगी उरण विधानसभा मतदार संघातील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या आयोजनाबाबत मंगळवार दिनाकं 28 रोजी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाची उरण तालुक्याची बैठक सुद्धा नवीन शेवा येथे संपन्न झाली.पदाधिकारी कार्यकर्त्यांना यावेळी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर यांनी केले.





शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मशाल चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारापर्यंत पोहचविण्याचे काम करायचे आहे.शिवसेना पक्षाची स्थापना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केलेली असून व शिवसेनेची निशाणी धनुष्यवाण चिन्हाची मातोश्रीवर अखंडपणे पूजन होत असून तो चिन्ह व शिवसेना पक्ष हा शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिला असून शिवसैनिकांच्या तीव्र नाराजीच्या भावना निर्माण झालेल्या आहेत.त्याचप्रमाणे भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिति, विधानसभा, लोकसभा या निवडणूका जिंकण्यासाठी नेत्यांचे महत्वाचे मार्गदर्शन होणार आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेला शिवसेना संघटना ही नुसता पक्ष नसुन तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा विचार असून सर्व सामान्य जनतेचा आधार आहे. म्हणून आपण सर्व शिवसैनिकांनी, युवासैनिक, महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या अंगिकृत संघटनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शिवगर्जना अभियानास व मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर,रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील,महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने