भाजप युवानेते प्रतीक बहिरा यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
पनवेल दि. २८ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांच्या वतीने महा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


आपल्या शहरातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांनी रविवार 5 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या दरम्यान तक्का मराठी शाळा, पनवेल येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात नोंदणी करण्यासाठी 8976972787 किंवा 7506637437 याक्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने