काशिनाथ जाधव : प्रतिनिधी पाताळगंगा : २८ फेब्रुवारी, उन्हाची चाहूल लागताच अनेकांचे पाय गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ यांच्याकडे वळत असल्याचे दृश्य सध्या अनेक ठीकाणी पहावयास मिळत आहे.माठाचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक असून या पासून अनेक फायदे होत असतात.यामुळे अनेकजण उन्हाळ्यामध्ये माठ खरेदी करीत असतांना पहावयास मिळत आहे.
होळीच्या नंतर उन्हाची दाहकता वाढत असते.यामुळे या माठाचे महत्व आजही आबाधित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोई म्हणून या माठाचा हॉटेल,तसेच विविध ठीकाणी वापर केला जात असल्यामुळे तालुक्याच्या ठीकाणी उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहे.मार्च महिन्यात च्या सुरुवातीस उन्हाच्या झळा सौम्य स्वरुपाच्या होत्या मात्र होळीच्या नंतर उन्हाचा दाह वाढू लागणार आहे .यामुळे येणारा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा होणार असल्याचे तर्क नागारिक यांच्या कडून वर्तवले जात आहे. उन्हाळ्यांची चाहूल लागताच आपली तृष्णा शांत करण्यासाठी अनेक जन थंड पेय यांच्याकडे आकर्षित होत असतात.
फ्रिजचे पाणी अनेकांना त्रास दायक असल्यांने प्रत्येक नागरीक माठ खरेदि करीत असतो.यामुळे कुंभार समाजाला रोजगार मिळत असतो.माठाला दरवर्षी उन्हाळ्यात मागणी वाढत असते. तरी सुद्धा श्रीमंत वर्गालाही या माठाचे आकर्षण आहे. माठातील थंडगार पाणी आणि चवीमध्ये माधुर्य असते.यामुळे माठाला गरीबांचा फ्रीज म्हटले असे संबोधले जाते.
Tags
पाताळगंगा