घोडिवली गावातील तलाव व आजूबाजूचा परीसर, संत निरंकारी यांच्या स्तुत्य उपक्रम









काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २८ फेब्रुवारी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते अमृत परियोजने अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील ७३० शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले. याचदरम्यान खोपोली सेक्टर अंतर्गत खालापूर तालुक्यातील घोडिवली येथील तलाव व विहीर, परिसर स्वच्छ करण्यात आले


            घोडीवली येथिल असलेल्या विहिर तलावाची स्वच्छता करण्यात आली.पाणी हे जिवन आहे.मात्र आपण या पाण्यांची योग्य काळजी घेवून पाणवढे स्वच्छ केल्यास पाण्यांचे झरे मोकळे होत असतात. शिवाय उन्हाळी जळ साठे तळ गाठत असतांना तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.मात्र या पाण्याच्या झरे मोकळे करुन पुन्हा पाणी मिळविता येत असल्यामुळे शेतकरी वर्गांची पाळीव प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात. यामुळे त्यांची तृष्णा शांत होत असते.  



                बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले होते.ग्राम पंचायत नांवढे अंतर्गत घोडीवली गावातील तलाव जलप्रवाहांची मोठ्या उत्साहाने स्वच्छता करण्यात आली. यावेळी खालापूर,कर्जत, सुधागड, येथील साधसंगत आणि सेवादलचे बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रा.पं. सरपंच उषा पिंगळे,उप संरपच अर्चना पिंगळे, सदस्य प्रकाश पिंगळे, आणि सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता.






थोडे नवीन जरा जुने