कै. वीर वाजेकर यांची 42 वी पुण्यतिथी निमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली.






उरण दि. 15 (विठ्ठल ममताबादे ) कामगारांचे नेते, कष्टकऱ्याचे दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले उरणचे भाग्यविधाते म्हणून परिचित असलेले कै.वीर वाजेकरशेठ यांची 42 वी पुण्यतिथी बुधवार दि. 15/2/ 2023 रोजी यूनियन बिल्डिंग,उरण कोटनाका, उरण शहर ता :- उरण,जि. रायगड येथे वाजेकरशेठ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून साजरी करण्यात आली .





उरण कोटनाका येथे आयोजित कै. वीर वाजेकरशेठ यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,विविध सामाजिक संस्था, संघटनाचे पदाधिकारी सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सरचिटणीस यशवंत ठाकूर यांनी आपल्या प्रस्तावनेतून वीर वाजेकरशेठ यांच्या कार्याची व विचारांची ओळख करून दिली.



यावेळी रमाकांत म्हात्रे, अँड विजय पाटील, यांच्यासह विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यानंतर अध्यक्ष महादेव बंडा यावेळी म्हणाले की वीर वाजेकरशेठ यांचे कार्य व विचार समाजासाठी आदर्श आहेत.उरण तालुक्यासाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.वाजेकरशेठ यांचे विचार व कार्य तळागाळात पोहोचले पाहिजे. गावागावात कार्य पोहोचले पाहिजे. त्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे. तरुण पिढीलाही वाजेकर शेठ यांच्या कार्याची ओळख झाली पाहिजे. तर शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक यांनीही वीर वाजेकर शेठ यांच्या कार्याचे, विचाराचे स्मरण करत वीज वाजेकरशेठ यांच्या कार्याचे, विचारांचे सर्वांनी आदर्श घ्यावा, प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच कुणाल पाटील यांच्यासह उपस्थित सरपंच,उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.



सदर कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मंगेश वाजेकर, जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील,मिठागर संघाचे अध्यक्ष बा. ध. पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत, नयना पाटील, माजी चेअरमन मनोहर पाटील, संचालक के. एस. ठाकूर,संचालक मु. ग. पाटील गुरुजी, संचालक दिलीप तांडेल यांच्यासह उरण पेठा मिठागर कामगार संघ, उरण पेठा मीठ उत्पादक सहकारी मंडळ, उरण महल सहकारी मजूर संघाचे पदाधिकारी सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने