काळ्या काचा बसवणा-यांवर पनवेल शहर वाहतूक पोलिसांची कारवाई एका दिवसात 76 वाहनचालकांकडून दंड वसूल






पनवेल दि.२३ (वार्ताहर) : चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेंतर्गत एका दिवसात 76 गाड्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.



चारचाकी गाड्यांच्या बाजूच्या काचा पन्नास टक्के व मागच्या बाजूची काच सत्तर टक्के पारदर्शक असावी, असे मोटार वाहन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र सर्रासपणे याहून अधिक काळ्या फिल्मच्या काचा बसविण्यात येत असल्याची बाब वारंवार समोर येत असते. याबाबत चारचाकी गाड्यांच्या काचांना कोणत्याही प्रकारची फिल्म लावू नये, असे न्यायालयाने दिले होते.



 त्यानुसारच आजपर्यत या वाहनावर कारवाई सुरूच आहे. मात्र वर्षभर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने काळ्या काचा लावणाऱ्या चारचाकी वाहनावर कारवाईची मोहीम सुरूच असते. मात्र एका दिवसात धडक मोहीम पनवेल शहरात राबवून, या कारवाईत 76 वाहनावर कारवाई केली. त्यानुसार त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.



थोडे नवीन जरा जुने