शिवसंवाद अभियानाअंतर्गत नियोजनपर बैठक संपन्न





पनवेल दि.२४ (संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना रायगड-पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंवाद अभियानाअंतर्गत पनवेल विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक शहरात व ग्रामीण भागात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहर, नवीन पनवेल शहर, तसेच खांदाकॉलनी शहर येथील शिवसेना शाखेमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी शिवसंवाद अभियाना बद्दल पदाधिकारी यांना माहिती देऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.


या बैठकीस जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, निरक्षक वैभव सावंत, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, जेष्ठ शिवसैनिक विश्वास म्हात्रे, महिला आघाडीच्या नवीन पनवेल शहर संघटीका सौ. अपूर्वा प्रभू, तसेच त्या त्या शहरावरील पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने