गुटखा घेऊन येणाऱ्या ट्रकवर कारवाई करत नवी मुंबई पोलिसांनी जप्त केला १ कोटींचा मुद्देमाल




पनवेल दि.२४ (संजय कदम) : गुजरातहून नवी मुंबईत गुटखा आणून विकणाऱ्या टोळीवर तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
नवी मुंबई येथील महापे चेक पोस्ट येथे तुर्भे पोलीसांना नाकाबंदी दरम्यान चेकिंग करीत असताना एका टेम्पोमध्ये गुटख्याच्या ३० मोठया गोण्या व टेम्पो जप्त केला होता. या अनुषंगाने तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी, सपोनि. प्रभाकर शिऊरकर, पोहवा जितेंद्र पवार, पोना सोमनाथ भालेराव, 


पोना संतोष पालवे, पोना आनंद सोनकांबळे, पोशि राजेश आघाव, पोशि मनोहर जाधव, पोशि राजेश उगाडे, पोशि सुनिल सकट आदींच्या पथकाला सदर गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी गुजरात येथून मागवुन त्याची ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड परिसरात वितरण करत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने डोंबिवली परिसरातील पलावा सिटी व पिंपळेश्वर मंदिरावे जवळुन आयशर कंटेनर व टेम्पो गुटख्यासह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही चालक व डोंबिवली मानपाडा येथून गुटखा विक्री करणारा इसम असे तीन जणांना ताब्यात घेवुन त्यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ९९ लाख ७८ हजार २६४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.




थोडे नवीन जरा जुने