लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत मार्गदर्शन
पनवेल दि.२४ (संजय कदम) : पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबद्दलचे महत्व यावर लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ. जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ जयश्री पाटील यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्व पटवून दिले. तसेच डॉ. जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीम मार्फत जवळपास १०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब व मधुमेहाचे तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत गुर्जर, उपाध्यक्ष माधुरी गोसावी, सचिव खेडेकर व ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. थोडे नवीन जरा जुने