रंगपंचमी सेलिब्रेशन रंग आम्हा महिलांसाठी

क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही रंगपंचमी सेलेब्रेशनचे आयोजन..
पनवेल प्रतिनिधी : पनवेलमधील अन्यायग्रस्त,पीडित, बेरोजगार महिलांच्या मदतीला नेहमीच तत्पर असणाऱ्या क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष/पनवेल वार्ता वेब न्यूज वाहिनी संपादिका सौ. रुपालीताई शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,फक्त महिलांसाठी रंगपंचमी सेलेब्रेशन चे आयोजन मंगळवार दि. ०७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते २ या दरम्यान नवीन पनवेल, २ नंबर पोदी या ठिकाणी केले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना हवे तसे जगता येत नाही किंवा रंगपंचमीच्या दिवशी मनसोक्त आनंद घेता येत नाही ह्याच उद्देशाने रुपालीताई शिंदे यांनी हा खास महिलांकरिता अभिनव आनंदाचा एक जल्लोषाचा उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्यामुळे इच्छुक महिलांनी नक्की रंगपंचमी सेलेब्रेशन मध्ये सहभाग घ्यावा असे क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष रुपालीताई शिंदे यांनी आवाहन केले आहे.
चला एक दिवस आपलाही कल्ला करूया खेळूया रंगपंचमी सख्यासोबत भेटूया सगळ्या महिला.थोडे नवीन जरा जुने