वाहतूक पोलिसांनी आवळल्या मोटारसायकल चोराच्या मुसक्या


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २७ फेब्रुवारी, मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरून चोरीची मोटारसायकल घेऊन जात असलेल्या तरुणांचा थांबवून चौकशी केली असता,त्यांची उडवायची उत्तरे पाहून संशय वाढला गेल्यामूळे त्या तरुणांना थांबवून या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात वाहतूक पोलिसांनी यश आले आहे.


              मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरून मोटार सायकलला परवानगी नसताना चोरटा दुचाकी घेऊन जात असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबत नसल्याचे पाहून पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबवून विचारपूस केली. परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याने दुचाकीच्या नंबर वरून चौकशी केली असता ती दुचाकी महेंद्र गोसावी रा.परळ मुंबई, यांची असून सदरची मोटारसायकल चोरीला गेल्याचे सांगितले व त्यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.


                 सदर मोटारसायकल चोर - साहिल दिनेश यादव वय १८ वर्ष, रा.प्रभादेवी दादर मुंबई, मूळ राहणार रामनगर जिल्हा बनारस राज्य उत्तरप्रदेश याला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. यावेळी महामार्ग पोलिस केंद्र प्रभारी अधिकारी पीएसआय गणेश बुरकुल, पीएसआय वसंत केसरकर, पोलीस हवालदार भगत, पोलीस हवालदार परदेशी, पोलीस नाईक महाजन यांनी आरोपीला पकडण्यात मोलाची कामगिरी बजावली.


थोडे नवीन जरा जुने