भेंडखळ येथील सी. डब्लू. सी.डिस्ट्रिकपार्क कोनेक्स गोदाम विरोधातील धरणे आंदोलन स्थगित






उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भेंडखळ येथील सी. डब्लू. सी. कोनेक्स गोदाम प्रवेशद्वारा समोर गावातील ग्रामविकास आघाडीचे समन्वयक अतुल भगत यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मागिल दिड वर्षांपासून हिंद टर्मिनल गोदाम बंद झाल्याने भेंडखळ गावातील सुमारे 225 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या सर्व कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन नव्याने येणाऱ्या कंपनी प्रशासनाने दिल्याने 9 फेब्रुवारी 2023 रोजी पासून सुरु करण्यात येणारे कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती भेंडखळ येथील ग्रामविकास आघाडीचे समन्वयक अतुल भगत यांनी दिली आहे.




उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत सी. डब्लू. सी.डिस्ट्रिकपार्क व सी. डब्लू. सी. लॉजिस्टिक पार्क नावाचे कंटेनर गोदाम आहे.येथील स्थानिकांनी सिडको प्रकल्पासाठी पिकत्या शेतजमिनी दिल्या. त्यावेळी सिडकोने या प्रकल्पग्रसतांना कायम स्वरूपी नोकऱ्या देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याच प्रमाणे मागिल दोन वर्षांपासून या कंपनीत कोनेक्स नामे कंपनीचे काम सुरु आहे. तेथे कोनेक्स कंपनीचा भागीदार संतोष शेट्टी हा कामगारांना अतिशय कमी वेतन देऊन परप्रांतीय कामगारांकडून काम करून घेत आहे.तर भेंडखळ गावात सुमारे 500 सुशिक्षित बेरोजगार असतांना हा तथाकथित ठेकेदार कमी पगारावर कामगारांना राबवत आहे.तेथे स्थानिकांची भरती करून केंद्र सरकारच्या कामगार कायदे धोरणानुसार किमान वेतन देण्याची मागणी या ग्रामविकास आघाडीने केली आहे.




यामध्ये भेंडखळ गावातील सर्व कामगारांना एकाच वेळी कामावर घ्यावे, कामगारांना किमान वेतन मिळावे, कंपनीतील सर्व कामे स्थानिक प्रकल्प ग्रासतांना मिळावीत व बाहेरील परप्रांतीय कामगारांना कमी करून स्थानिक प्रकल्पग्रस्तांची भरती करावी. या प्रमुख मागण्या 27 जानेवारी 2023 रोजी कंपनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या असून 9 फेब्रुवारी 2023 रोजी धरणे आंदोलन सुरु होण्याआधीच पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिल्याने भेंडखळ येथील विठ्ठल - रूखमाई मंदिरा समोर ग्रामविकास आघाडी चे पदाधिकारी आणि उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शना नंतर करण्यात येणारे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने