प्राथमिक आदर्श मोठीजुई शाळेतडिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता मार्गदर्शन शिबिर संपन्न.उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई या शाळेत दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी Vyaktitva Learning लॅब्स च्या माध्यमातून शाळेतील इ.5 वी ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना
Introductory Session/ प्रास्ताविक सत्र Digital Safety and Media Literacy/ डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता माध्यमातून घेण्यात आले.या लॅबचे निखिल लता, गजानन सर व मयुरा सावी यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये विद्यार्थ्यांसोबत आजच्या मीडियाने व्यापलेल्या जगात, डिजिटल संसाधने, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर, चुकीची माहिती व अयोग्य कॉन्टेंट इत्यादींमुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होतात. यामुळे विद्यार्थी इंटरनेटचे व्यसन, वाईट प्रभाव, साइबर क्राइम, ऑनलाइन स्कॅम, फ़िशिंग ईत्यादींना बळी पडण्याचा धोका वाढतो.


 यात त्यांचा अभ्यास, डिजिटल सुरक्षितता, मानसिक आरोग्य, वागणूक, इतरांबद्दलचा दृष्टिकोन, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन यांच्यावर सुद्धा परिणाम होतो.याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच यावर उपाय म्हणून लहान वयात व शालेय स्तरापासून माध्यम साक्षरता व डिजिटल सेफ़्टी चे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ज्याद्वारे त्यांना सर्व प्रकारच्या मीडिया, इंटरनेट आणि इतर डिजिटल तंत्रज्ञान जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने वापरण्यासाठीच्या ज्ञान, क्षमता आणि कौशल्य प्राप्त होतील. ते एक प्रभवी डिजिटल सिटिज़ेन (Digital Citizen) बनण्यासाठी मदत होईल.असे मत व्यक्त केले.सुरूवातीला उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत मुख्याध्यापक संजय होळकर यांनी करून प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाला अश्विनीताई भोईर सरपंच मोठीजुई, माधुरी भोईर सदस्या ग्रामपंचायत मोठीजुई,तृप्तीताई बंडा उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती,सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दर्शन पाटील यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने