सकल मराठा समाजाच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन





पनवेल दि.२० (संजय कदम) : सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्यावतीने खांदाकॉलनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२३ चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी या ठिकाणी करण्यात आले. यंदाचे या उत्सवाचे सहावे वर्ष होते. या निमित्त सकल मराठा समाज खांदा कॉलनीचे मार्गदर्शक, आर डी ढोबळे, एच पी गॅस एजन्सी चे सर्वेसर्वां रामचंद्र ढोबळे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिववंदना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण खांदा कॉलनी सह परिसरातील शिव प्रेमींची तुफान गर्दी त्यांचा उत्साह दाखवीत होती. 


           यानंतर खांदाकॉलनी सह पनवेल परिसरातील शिवभक्त, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शिवप्रतिमेचे दर्शन घेतले. विविध तरुणांच्या शिवप्रेमी मंडळाच्या बाईक रॅली, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील शिवप्रेमी, वेषभूषा करीत लहान बाल गोपाळ व नागरिकांनी या ठिकाणी उपस्तीती दर्शवली. यानंतर संत जनाई महिला भजन मंडळाचा " हरिपाठ " गायनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या वेळी वारकरी संप्रदायातील लोकांनी उपस्तीती दर्शवली. पनवेल चे सुप्रसिद्ध नादस्फुर्ती ढोल ताशा पथक यांच्या वादनासह भव्य दिव्य शाही मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीत सहपरिवार येत शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला


. शिवजयंती साजरी करत असताना आपल्या संस्कृती चे दर्शन घडवत छत्रपतींचे विचार जन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत या संकल्पनेतून ऐतिहासिक वेशभूषा करून आलेल्या बाल गोपालांना मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, माँसाहेब जिजाऊ, झाशीची राणी, बाल शिवराय यांच्या रूपातील वेशभूषा करीत पोवाडे, व्याख्यानगायन चा कार्यक्रम सादर केला. अश्यारितीन शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची सांगता झाली.




थोडे नवीन जरा जुने