शिवजन्मोत्सव निमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित प्रा.नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद


पनवेल दि.२० (संजय कदम) : छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, व्यवस्थापन हे आजही मार्गदर्शक आहेत. स्वराज्य स्थापन करताना महाराजांना मिळालेले मावळे हे स्वराज्यासाठी ध्येयवेडे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आहे असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रा.नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानंच आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलोनी सेक्टर ९ येथील बुधवार बाजार मैदान येथे आयोजित या व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने खांदा वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने