ओरियन मॉलमध्ये शिवजयंती निमित्त नाट्य सादरीकरण
पनवेल दि.२० (संजय कदम) : पनवेल शहरात खरेदीसाठी ग्राहकांच्या आवडीचे ठिकाण असलेल्या ओरियन मॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रंगरचना कलामंच नाटय संस्थेने ‘मी छत्रपती शिवाजी महाराज होणार’ या नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. 


महाराष्ट्राचे आराध्यदैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रंगरचना कलामंच नाट्यसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर व मनानं परुळेकर यांच्या सहकार्याने ‘मी छत्रपती शिवाजी महाराज होणार’ या नाटकाच्या दोन प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
 या प्रयोगांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत मुलांच्या अभिनय आणि सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर, मनन परुळेकर यांनी सदर व्यासपीठ उपलब्ध करून देऊन स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल विजय पवार यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने