छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दुधेविटेवरी कॉम्पेक्स मध्ये उत्साहात साजरी




पनवेल दि.२० (संजय कदम) : दुधेविटेवरी कॉम्पेक्स सेक्टर ३ A, कंरजाडे येथे दूधे बिल्डर्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम यंदाही अतिशय जल्लोषात साजरा झाला.
         कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सोसायटी मधील सर्व धर्मीय मुला-मुलींनी बाजीप्रभू देशपांडे या पोवाडा वर चलचित्र देखावा नृत्य सादर ‌केले. तसेच पोवाडा आणि शिवाजी महाराजांवर भाषण असे अनेक कार्यक्रमात मुलांनी सहभाग घेतला होता. करंजाडे ही नव्याने विकसित झालेले शहर आहे



. या शहरांमध्ये तुकाराम दुधे बिल्डर्स हे एकमेव बिल्डर्स आहेस जे सलग गेले पाच वर्ष आपल्या सदनिकेची च्या आवारात स्वतः शिवजयंती उत्सव साजरा करतात. हा उत्सव साजरा करण्यामागे एक उद्दिष्ट आहे की आपला इतिहास आणि स्वराज्य कसे निर्माण झाले हे भावी पिढीला समजले पाहिजे. प्रत्येक घरात आदर्श व्यक्तिमत्व श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजामाता पोहचले पाहिजे. तसेच दरवर्षी सदनी के सोबत सदनिकेच्या बाहेरी आदिवासी पाड्यातील आणि इतर मुलांनाही कार्यक्रमात सहभाग करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिला जाते. 




या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समीर रामचंद्र खरे वक्ता म्हणून लाभले होते. त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील व्याख्यान दिले. तसेच सोनल मोहरोळे यांनी लाटी काटी, तलवारबाजी, भाला, दांडपट्टा चालवणे यांचे प्रात्यक्षिक दाखवले. शितलताई निकम यांनी महिलांना स्व संरक्षणाची गरज काय आहे याचे महत्त्व पटवून दिले व लव जिहाद या विषयावर वकृत्व केले. कवीवर्य राजा बडे लिखित आणि शाहीर साबळेंनी गायलेलं जय जय महाराष्ट्र माझा या गीताला आता आपल्या महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी तुकाराम दुधे यांनी सगळ्या सहकाऱ्यांचे मानचिन्ह देऊन आभार मानले.



थोडे नवीन जरा जुने