केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना नविन पनवेल शहराच्या वतीने निदर्शने




पनवेल दि.२० (वार्ताहर) : केंदीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्हा संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्यभरात ठाकरे गटाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहरच्यावतीने निदर्शने करण्यात आली.  


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नविन पनवेल शहर शाखेतर्फे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नविन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर शाखेतर्फे केंद्रिय निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नविन पनवेल मधील पदाधिकारी विभागप्रमुख किरण सोनावणे, उपविभाग प्रमुख राजेश वैंगणकर, अविनाश गव्हाणकर, उपशहरसंघटिका मालती पिंगळा, विभाग संघटिका वैशाली थळी, शाखाप्रमुख सत्यवान गायकर, योगेश मोरे, जनार्दन खानविलकर, सावंत, आत्माराम शिंदे, महिला आघाडीच्या शाखा संघटिका सेजल खडकबाण, अर्चना पाटील, मनीषा भुर्के, शिल्पा तांबेकर, किरण वर्मा, केसर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने