संस्कार भारती उत्तर रायगड जिल्हा समितीतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

पनवेल दि.१० (संजय कदम): संस्कार भारती उत्तर रायगड जिल्हा समितीतर्फे युवकांकरता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.   पनवेल (खारघर पर्यंत), उरण, पेण, अलिबाग, खालापूर, कर्जत, सुधागड-पाली या तालुक्यात राहणाऱ्या स्पर्धकांसाठीच हि स्पर्धा असून राष्ट्रभक्तीची तुमची व्याख्या, भारताच्या प्रतिज्ञेचा तुम्हाला समजलेला अर्थ, माझ्या तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकाची सत्य कहाणी या विषयांवर 600 शब्दांमध्ये निबंध लिहून द्यायचा आहे. सदर स्पर्धेची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी असून स्पर्धेचा बक्षीस समारंभ 25 फेब्रुवारी 2023 रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात होणार आहे. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


थोडे नवीन जरा जुने