रविशेठ पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.







उरण दि 11 (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, श्री साई संस्थान साईनगर वहाळचे संस्थापक, रोटरी क्लब उलवेचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र, जे.एम म्हात्रे चैरिटेबल ट्रस्ट पनवेल, श्री साई संस्थान साईनगर वहाळ, सुभाषशेठ भोपी सामाजिक संस्था रिटघर व श्री समर्थ कृपा स्वयंसहाय्यता संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि 9 फेब्रुवारी - 2023 रोजी सकाळी 9:30 वा. वेश्वी राजिप मराठी शाळा येथे प्राणी व पक्षी या विषयावर चित्रकला स्पर्धा, बोनविटा तसेच ज्यूसचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.करुणेश्वर वृद्धाश्रम भानघर येथे आजी आजोबांना मायेचे उबदार पांघरून ब्लॅंकेट्स वाटप, सायंकाळी 7 वा श्री साईबाबा मंदिर वहाळ येथे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकाचे अनावरण संपन्न झाले .


यावेळी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर,उपाध्यक्ष महेश पाटील,पूर्व विभाग प्रमुख अनिल घरत , गव्हाण विभाग प्रमुख योगेश कोळी, महिला विभाग प्रमुख -श्रावणी, उलवे नोड विभाग प्रमुख अंकिता नाईक,प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भारत भोपी, सुभाषशेठ भोपी,श्री समर्थ कृपा स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे,सहकारी मित्र परिवार पूर्व विभाग अध्यक्ष संपेश पाटील, अध्यक्ष रोशन पाटील,सामाजिक कार्यकर्ते माधव म्हात्रे, गोल्डन ज्युबली मित्र मंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवार 10/2/2023 रोजी श्री साई मंदिर वहाळ येथे सकाळी 10:30 वाजता प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे शिवचरित्रावर सुंदर असे व्याख्यान झाले.शिवचरित्र व सध्याचे मानवी जीवन याची सुंदर सांगड प्रशांत देशमुख यांनी आपल्या व्याखानातून बांधली. यावेळी रविशेठ पाटील यांना सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आमदार महेश बालदी ,पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे,राजू मुंबईकर, राणीताई मुंबईकर,माजी जिल्हा परिषद सदस्य रवि पाटील, भारत भोपी, सुभाषशेठ भोपी, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, पोलीस अधिकारी जगदाळे , रविंद्र पाटील ( एन. आर. आय. पोलिस स्टेशन) केअर ऑफ नेचरचे सल्लागार विठ्ठल ममताबादे, पदाधिकारी अनिल घरत,विलास ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.



 रविशेठ पाटील यांनी वहाळ येथे साई मंदिर बांधून अनेक लोकांना भक्ती मार्गाला लावले. अनेक व्यसनी तरून निर्व्यसनी झाले.सन्मार्गाला लागले.साई मंदिर मुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला. प्रत्येक व्यक्ती मध्ये सदाचार,चांगले विचार रुजविण्याचे साई मंदिर महत्वाचे केंद्र बनले आहे.रविशेठ पाटील यांनी साईबाबांच्या शिकवणुकीचा, कार्याचा, विचारांचा तळागाळात प्रचार केला. अडीअडचणीत असलेल्या अनेक नागरिकांना रविशेठ पाटील यांनी मदतीचा हात दिला आहे. अनेकांचे तूटत चाललेले संसार उभे केले आहेत.प्रत्येकाशी नम्रतेने बोलून प्रत्येक समस्या मधून नागरिकांना मार्ग दाखविला.प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे रविशेठ पाटील हे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहेत त्यामुळे अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे रविशेठ पाटील यांना माननारा खूप मोठा वर्ग रायगड जिल्हा व नवी मुंबईमध्ये आहे.


थोडे नवीन जरा जुने