कळंबोलीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय! मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण





पनवेल /प्रतिनिधी:- पनवेल परिसरातील नागरिकांचे प्रश्न त्याचबरोबर समस्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कळंबोलीत प्रशस्त असे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आले आहे. संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या या कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.




कळंबोली सेक्टर 3 ई येथे सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे, लातूरचे संपर्कप्रमुख ऍड श्रीनिवास क्षीरसागर, महानगर संघटक मंगेश रानवडे, महानगर संघटिका ऍड सुलक्षणा जगदाळे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, माजी महिला बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर, भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष रवीनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, अमर ठाकूर, प्रियंका गाडे, उद्योजक अमित घारापुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी अशा प्रकारच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना जनसामान्यांची कामे करणार असल्याचे सांगितले. शासनाच्या योजना जनतेपर्यंत येथूनच पोहोचवण्यात येतील असेही ते म्हणाले. ठिकठिकाणी शाखा सुरू करण्याचे काम बाळासाहेबांच्या शिवसेनेने हाती घेतले आहे. कळंबोली येथील कार्यालयामध्ये नागरिकांनी आपले प्रश्न आणि समस्या घेऊन यावे त्याचे नक्कीच निरासन होईल अशी ग्वाही सुद्धा या निमित्ताने पालकमंत्र्यांनी दिली. रामदास शेवाळे यांनी पक्षाचे हे मध्यवर्ती कार्यालय असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरा बरोबरच या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण करून त्यांना वेगळ्या शुभेच्छा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. हे कार्यालय सर्व सामान्य नागरिकांसाठी कायम खुले राहील असेही त्यांनी सांगितले.




अशीच एकजूट कायम ठेवा!
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची मित्रपक्षाबद्दलची सन्मानपूर्वक समन्वयाची भूमिका आहे असे सांगत त्यांचे कौतुक केले. तर आ. ठाकूर यांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी समाधान व्यक्त करत अशीच एकजूट कायम ठेवण्याचा सल्ला दिला.




शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. अमरराजे वामन यांच्यासह
 प्रशांत जाधव, आतीष पाटील, रोशन,राहुल सुबे, गणेश सोले, बारकु पांडुके
प्रविण भालेराव,निलेश अनभुले,
मोहन शेलार,अमोल नालकोल, ओमकार जाधव,रमेश गरुड, प्रल्हाद गिते, गणेश कडाली,अमोल पाठक
संदीप पाटील, सचिन डांगरे, अविनाश पाटील, बंटी पवार
गणेश औटे, योगेश औटे, शंकर खाडे संतोष औटे रोहण राजगुरु, वैभव उमापे, रामदास पांडुळे यांच्यासह स्वराज ग्रुप कळंबोली मधील कार्यकर्त्यांचा समावेश होता.



थोडे नवीन जरा जुने