बाळासाहेबांची शिवसेना तर्फे उलवे मध्ये मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा.


उरण दि 9(विठ्ठल ममताबादे ) उरण विधानसभा मतदारसंघाचे संघटक कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद व उलवे शहर चे विभागीय प्रमुख प्रभाकर पाटील व सहकारी पदाधिकारी व महिला आघाडी तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील न्यू मिलेनियम हॉस्पिटल व विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना फळे वाटप करण्यात आली


. तर न्यु इंग्लिश स्कूल बामण डोंगरी व येथील शाळांतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना केशरी दुधाचे व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृष्णा पाटील, प्रभाकर पाटील, संपर्कप्रमुख राजन म्हात्रे, , वहाळ ग्रामपंचायतचे संघटक रामदास पाटील, अनंता गडकरी शाखाप्रमुख बामण डोंगरी, सुधीर घरत शाखाप्रमुख वहाळ, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते परशुराम कोळी, मोहा शाखा प्रबोध धनंजय कोळी, तरघर शाखाप्रमुख संतोष मोकल, शाखाप्रमुख सेक्टर 18 राकेश वेदांत, शाखाप्रमुख प्रसाद पाटील, शाखाप्रमुख सेक्टर 19 अतिश ठाकूर, संयोजक शरद पाटील, युवा सेना अजिंक्य म्हात्रे, प्रतीक पाटील, रमाकांत नाईक, कौस्तुभ म्हात्रे, महिला आघाडी श्रीमती नंदिता म्हात्रे, श्वेता पाटील, वंदना पाटील, नम्रता नाईक, प्राची पाटील, करिष्मा पाटील, नो इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका मॅडम, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने