ओव्हरलोड वाहनाला ठोठावला दंड

माणगाव निजामपूर मार्गावर अवजड वाहतूकीची मनसेतर्फे दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत रायगड जिल्हा उपप्रादेशिक अधिकारी पेण यांनी या वाहनावर 39 हजाराचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या चालक मालकांचे धाबे दणाणले आहेत.माणगाव निजामपूर या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त भार असणाऱ्या अवजड वाहनामुळे लहान मोठ्या स्वरूपाचे अपघात सतत घडत आहेत. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व माणगाव तालुकाध्यक्ष प्रतिक रहाटे यांनी या अवजड वाहतूकीवर कारवाई करावी अशी मागणी माणगाव पोलीस ठाण्यात केली होती. या मार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त भार अवजड वाहने कॉईल घेऊन कोस्ते बुद्रुक येथील जेटीएल कंपनीकडे वाहतूक चालू असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीला नागरिकांना सामना करावा लागतो. नुकताच माणगाव बाजूकडून जेटीएल कंपनीकडे कॉईल घेऊन निघालेल्या कंटेनर पाणोसे पुलाजवळील धोकादायक व तीव्र उतार असणाऱ्या वळणावर चुकीच्या बाजुला बंद पडल्याने अन्य वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत. अवजड वाहतूक या मार्गावर होत असल्याची तक्रार मनसे पदाधिकाऱ्यांनी माणगाव पोलीसांकडे करून लक्ष वेधले होते. या तक्रारीत म्हटले आहे की, ट्रेलर गाडीची आर. टी. ओ. पासींग 36 ते 42 टनाची पासींग असताना 50 ते 60 टन वजनाची अवजड वाहतूक बेकायदेशीररित्या केली जात आहे. या वाहतूकीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना लागत आहे.पाणोसे नदीवरील पुलाजवळ ट्रेलरवर भारक्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करताना मिळुन आली म्हणुन हे वाहन ताब्यात घेऊन त्याची जेटीएल कंपनी निजामपुर येथे काटा पावती करुन पेण उपप्रादेशिक अधिकारी यांना माणगाव पोलीस ठाणे यांनी या वाहनावर कारवाई करण्याचा अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार पेण उपप्रादेशिक अधिकारी एम. एन. उचगावकर यांनी जास्त भार असल्याची या वाहनाची तपासणी करुन ऑनलाईन चलन अन्वये 39, 000/- रुपये दंड ठोठावण्यात आला. या दंडाची रक्कम ऑनलाईन जमा झाल्याची खात्री केल्यानंतर आरटीओ यांचे आदेशाने हे वाहन सोडण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने