लग्नाच्या आमिषाने विधवेवर बलात्कार






विधवा महिलेस लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीस माणगाव सत्र न्यायालयाचे विशेष व सत्र न्या. हर्षल भालेराव यांनी 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना महाड एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सन 2016 पूर्वी सुमारे दीड वर्षापासून घडली आहे. गुन्हयातील फिर्यादी पिडीत महिलेला आरोपी संजय राजाराम कदम याने लग्नाचे अमिष दाखवून फिर्यादी पिडीत महिला यांचेसोबत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले



. त्यातून फिर्यादी या गरोदर राहुन प्रसुती होऊन त्यांनी मुलास जन्म दिला होता. सदर बाबत फिर्यादी यांनी आरोपी यांस सांगितले असता त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. तसेच झालेले मुल हे माझे असले बाबत कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी दिली. वरील घटनेची फिर्याद महाड एम. आय. डी. सी. पोलीसानी घेतली. या गुन्हयाचा तपास सहा पोलिस निरीक्षक एन. डी. सस्ते यांनी करुन दोषारोप पत्र मा. जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. 



सदर खटल्याची सुनावणी मा. विशेष न्यायालय, माणगाव - रायगड येथे झाली व सदर गुन्हयात पिडीत महिलेची साक्ष व डी. एन. ए. चा अहवाल महत्वाचा ठरला. सदर खटल्यामध्ये अति शासकिय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे, यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी यु. एल. घुमारकर, पोलिस उपनिरीक्षक, छाया कोपनर मपोह, शशिकांत कासार, पोह व शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. न्यायाधीश श्री हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर आरोपी संजय राजाराम कदम यांस दोषी ठरवून दि. 14 फेब्रुवारी रोजी भा. द. वि. सं. कलम 376 (2) (एन) अन्वये 10 वर्ष सक्तमजूरी रु.60,000/- दंड, भा. दं. वि. क. 506 अन्वये 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.


थोडे नवीन जरा जुने