पनवेल दि.०७(वार्ताहर): पारगाव गावातील रस्त्याच्या कामासाठी आमदार महेश बालदी यांच्या निधीतून १० लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन झाले.
उरण मतदार संघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्याअंतर्गत त्यांच्या निधीमधून पारगाव गावातील खालची आळी येथे रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. याकामाचे भूमिपुजन पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्याहस्ते झाले.
या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी उपसरपंच सुनंदा हरिभाऊ नाईक, ग्रामपंचायत सदस्य कल्पना राजेश तारेकर, माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी उपसरपंच मनोज दळवी, माजी उपसरपंच निशा रत्नदीप पाटील, अंजली राहुल कांबळे, रत्नदीप पाटील, पवन तारेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, नामदेव पाटील, राम दरेकर, उदय पाटील, संदेश पाटील, सचिन कांबळे, तुलसीराम म्हात्रे, जयंत भोईर, सुनील मोकल, निरंजन राजेश तारेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
पनवेल