खेळाडूंच्या सरावाला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचा मदतीचा हात खेळाडूंच्या सरावाला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचा मदतीचा हात
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ७ फेब्रुवारी, संतोष शिंगाडे यांनी जनसेवा सामाजिक प्रतिष्ठानांच्या माध्यमातून विविध स्तुत्य उपक्रम हातामध्ये घेवून विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे त्यांचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे. सारसई आरोग्य उपकेंद्रे येथे येत
असलेल्या रुग्णांस पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नव्हते.मात्र त्यांची समस्या मार्गा लावण्यात या ठिकाणी ॲक्वा फिल्टर बसविण्यात आले.यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असलेया रुग्णांस शुद्ध पाणी मिळत आहे.
त्याच बरोबर सारसई या मार्गावर वळणे असल्यामुळे या ठिकाणी दिशादर्शक फळक नसल्यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत होती. मात्र या मार्गावर अपघात होवू नये यासाठी या ठिकाणी दिशादर्शक फळक लावण्यात आली.
त्याच बरोबर जनतेसमोर प्रखरपणे बोलता यावं , आपल्या हक्क-अधिकार, न्याय-अन्याय याला शब्दांवाटे वाचा फोडण्याचं धाडस त्यांच्यात बालवयापासून व्हावं म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी माइक व ब्लूटूथ स्पीकरचा पूर्ण सेट भेट देण्यात आले.
आज तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट चे सामने आयोजित केले जाते.तरुण वर्गांनी खेळामध्ये आपले कौशल्य दाखवून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे या उद्दात विचारांतून ४ दिवस या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर गोर गरिब गरजू २०० नागरिकांना गरजूना शिवभजोन मोफत शिव भोजन देण्यात आले
Tags
पाताळगंगा