काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ६ फेब्रुवारी, खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील तरुणाईकडून क्रिकेट खेळाला अधिक पसंती मिळत असल्याने या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची धुरा प्रशांत खांडेकर यांनी ५ वर्ष यशस्वपणे सांभाळली असता त्याचा पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर बिनविरोध अध्यक्षपदी गोहे चिंचवली गावातील जेष्ठ खेळाडू गणेश नाना पाटील यांची निवड करण्यात आल्याने सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सर्व सामन्यावंर नियंत्रण व सामन्यातील अटी नियमांचे उल्लंघन होता कामा नये तसेच सामने शांततेत पार पडावे, या सर्व घडामोडीवर कंट्रोल राहावे या दृष्टीने तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंनी एकत्र खालापूर - खोपोली क्रिकेट असोसिएशनची स्थापन गेल्या काही वर्षापूर्वी केली होती. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन राजकीय पक्ष - सामाजिक संस्था व अन्य मंडळे करित आहे.
तर या नवनिर्वाचित कमिटीमध्ये अध्यक्षपदी गणेश (नाना) पाटील, उपाध्यक्ष पदी मनोज पाठारे - संदेश पाटील, सल्लागारपदी प्रशांत खांडेकर - संजय सोळंकी, खजिनदारपदी गौरव घोसाळकर, सेक्रेटरी अंकेश तांबडे - रोहन पिंगळे - मुफीद परकार व सदस्यपदी केतन मुंढे - प्रसाद भोईर - राकेश गायकर - संतोष जोरकर - रुपेश पाठारे - सिद्धेश चोगले - तुषार धुमाळ - गणेश सावंत आदींची निवड करण्यात आली असून ही सर्वसाधारण बैठक ताकई येथील एन.पी.ढाबा येथील हाँलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने खेळाडू वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
Tags
पाताळगंगा