प्रसिद्धीपत्रक




बेनू हेरिटेज’च्या वतीने भारतीय शास्त्रीय संगीत वारसा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत

भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या मुंबईतील बेनू हेरिटेज म्युझिकल कॉंन्सर्टमध्ये 300 शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग


मुंबई, 07 फेब्रुवारी, 2023: मुंबईमधील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांचे सुमारे 300 विद्यार्थी दिग्गज संतूर वादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांच्या मधुर सुरावटीत आणि प्रख्यात गायक पंडित जयतीर्थ मेवूंडी यांच्या गायनात भान हरपून सहभागी झाले. भारताच्या समृद्ध शास्त्रीय संगीताचे जतन करून हा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा सहभागी विद्यार्थ्यांनी ‘बेनू हेरिटेज’च्या भारतातील सर्वात भव्य उपक्रमात घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आले होते.    



भारतातील वेगाने वाढणारी मालवाहतूक व्यवस्थापन कंपनी मॅट्रिक्स फ्रेट सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत शास्त्रीय संगीत, नृत्य, कला आणि स्वदेशी हस्तकलेच्या क्षेत्रात भारतीय संस्कृती आणि वारशाचा प्रचार करणाऱ्या BENU या विना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने ‘बेनू हेरिटेज’चे आयोजन केले होते. 

या संगीत जलशाचं उद्घाटन शालेय शिक्षकांसह सुप्रसिद्ध गायिका आणि बेनूच्या अध्यक्षा विदुषी श्रीमती पद्मजा चक्रवर्ती, मॅट्रीक्स फ्रेट सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जयंता रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  


बेनू’च्या वतीने मुंबई, अहमदाबाद आणि नवी दिल्ली अशा तीन शहरांमध्ये बेनू हेरिटेज म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. या मैफिलीचे पहिले पुष्प आज मुंबईत गुंफले गेले आणि इतर दोन मैफिली अहमदाबाद आणि मुंबईत संपन्न होतील. मुंबईतील उद्घाटनाच्या आवृत्तीत, दिग्गज संतूर वादक पद्मश्री पंडित सतीश व्यास आणि गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी शालेय विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीताच्या वैभवाकडे नेणारे भावपूर्ण राग प्रस्तुत करून दाखवले. 

शास्त्रीय संगीताचा भारतीय वारसा शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याच्या उद्देशाने बेनू’च्या वतीने बेनू हेरिटेज’चे संगीतमय व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यांना या माध्यमातून संगीताच्या समृद्ध परंपरा आणि गुणवत्तेबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमातून भावी पिढीत मोठ्या संख्येने कलाकार तयार करण्याचा मानस आहे. 

या उपक्रमाविषयी बोलताना, बेनू’च्या अध्यक्षा विदुषी श्रीमती पद्मजा चक्रवर्ती म्हणाल्या, “पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या आणि त्याला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, आम्ही अभ्यासक्रमाला पुन्हा परिभाषित करण्याचा आणि भारतीय शास्त्रीय वारसा संगीताचा प्रचार करण्याचा आमचा मानस आहे. आता, BENU एक 'संस्थात्मक दृष्टिकोन' घेऊन काम करेल आणि शाळा आणि महाविद्यालयांमधील तरुणांपर्यंत पोहोचेल. ज्याद्वारे आम्ही त्यांचे सहयोगी म्हणून काम करू आणि त्यांना दर्जेदार भारतीय शास्त्रीय संगीताची समज देऊ. आत्तापर्यंत तरुण मनांना असा अनुभव घेण्याची संधी नव्हती. तरुण पिढीने आपला समृद्ध परंपरागत वारसा जपण्याचा ध्यास घ्यावा अशी आमची इच्छा आहे, जेणेकरुन जेव्हा त्यांना योग्य मूल्य कळेल. तेव्हाच त्यांना आपला समृद्ध वारसा जपता येईल. हे छोटेसे पाऊल असले तरी आपला सांस्कृतिक वारसा बळकट करण्यासाठी हा प्रयत्न इतकाच महत्त्वपूर्ण ठरेल.”


उपक्रमाचा एक भाग म्हणून, BENU महिन्यातून किमान एकदा विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण देण्यासाठी इछुक शाळांसह सहभागी होईल.


श्रीमती चक्रवर्ती पुढे म्हणाल्या, “भारतीय शास्त्रीय संगीत मोठ्या प्रमाणावर शालेय स्तरावर शिकवले जात नाही आणि त्या दिशेने Benu’ला योगदान देण्याची इच्छा आहे. आमच्या प्रयत्नांमुळे मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुणांसह आवड निर्माण होईल याची आम्हाला खात्री वाटते. यामुळे पुढील काही वर्षांत भारतीय वारसा संगीताकडे सांस्कृतिक बदल घडवून आणण्यास मदत होईल. आम्ही शैक्षणिक संस्थांमध्ये शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करू, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आणि संगीताशी संबंधित इतर आवश्यक बाबी उपलब्ध करून देऊ.”

भारतीय शास्त्रीय संगीताच्या संस्कृतीला चालना देणे आणि अशा उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या गरजेबद्दल बोलताना, मॅट्रिक्स फ्रेट सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’चे ​​व्यवस्थापकीय संचालक श्री जयंता रे म्हणाले, “भारतात, सांस्कृतिक राष्ट्रवादाला त्याचा भाषिक वारसा, संस्कृती आणि विविधतेचा अभिमान आहे. परंतु, त्याच वेळी, आपल्या शास्त्रीय संगीताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करण्याची गरज आहे, जो नष्ट होत आहे. जोपर्यंत आपण शास्त्रीय संगीत आणि आपल्या वारशात आपली मूळं खोलवर रुजवत नाही, तोपर्यंत आपल्यासाठी वेगळेपण सिद्ध करणे आणि आपली ओळख निर्माण करणे खूप कठीण जाईल.”

BENU बद्दल:

'BENU' ही शास्त्रीय संगीत, नृत्य, कला आणि स्वदेशी हस्तकलेच्या क्षेत्रात भारतीय संस्कृती आणि वारसा यांचा प्रचार करणारी एक विना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. BENU सध्या भारतातील नवी दिल्ली राज्यात ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत आहे आणि देशभर विविध उपक्रम करते. या ट्रस्टच्या स्थापनेपासून, BENU ने भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
थोडे नवीन जरा जुने