श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फळे वाटप.उरण दि 18 फेब्रुवारी (विठ्ठल ममताबादे )

                                            उरण तालुक्यात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भाविक भक्तांना उपवासाचे पदार्थ म्हणून केळी या फळाचे वाटप करण्यात आले. 


सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे , सचिव प्रेम म्हात्रे, खजिनदार - सुरज पवार, सहखजिनदार गणेश म्हात्रे, रोहन पाटील, विक्रांत पाटील, साहिल म्हात्रे,आकाश पवार , शुभम ठाकूर,प्रणित पाटील, तेजस सणस, निकिता पाटील,सानिका पाटील, सत्यजित थोरात आदी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने