रेल्वे पोलिसांनी केला सापडलेल्या लॅपटॉपसह मोबाईल फोन व कॅमेरा केला परत
पनवेल दि २७ (वार्ताहर) : रेल्वे प्रवासादरम्यान विसरलेल्या लॅपटॉपसह मोबाईल फोन व कॅमेरा प्रवाश्यांना परत देण्यात आल्या आहेत.  उत्तरप्रदेश मधून पनवेल मध्ये आलेल्या आयुष जैन या तरुणाची लॅपटॉप ची बॅग पनवेल रेल्वे स्टेशन मध्ये विसरले होते त्यावेळी तेथे कार्यरत असणाऱ्या पोलिसांना ती बॅग सापडल्याने त्यांनी सदर प्रवाशाशी संपर्क साधून ओळख पटवून लॅपटॉप पार्ट देण्यात आलं आहे. तर अश्याच प्रकारे एका प्रवाशाचा मोबाईल सुद्धा विसरला होता सदर मोबाईल सुद्धा त्याला परत देण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत शुभम सर्वेराज याचा कॅमेरा असलेली बॅग तो सुद्धा विसरून गेला होता सदर बॅग सुद्धा शहनिशा करून त्याला परत करण्यात आली.


थोडे नवीन जरा जुने